नादुरुस्त मालवाहू ट्रक ची ग्यारेज वर दुरुस्ती करताना अज्ञातांनी मारहाण केल्याने ट्रॅक चालक सह तिघे जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री चिकलठाणा येथील हिना नगर भागात घडली मात्र जवळील काही रक्कम अज्ञातांनी नेल्याचा आरोप जखमींनी केला असून दुपारपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालं न्हवता. अजीम बेग अहेमद बेग, शहीद बेग अहेमद बेग,अमजद बेग अहेमद बेग (सर्व राहणार बदनापूर,जि.जालना) अशी जखमींची नावे आहेत.
या बाबत जखमी यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अजीम बेग यांच्या मालकीची (एम.एच.21बी.एच.5757) ही मालवाहू ट्रक शनिवारी औरंगाबादेत खराब झाल्याने ती ट्रक चिकलठाणा भागातील हिनानागर परिसरातील एका ग्यारेज मध्ये दुरुस्तीसाठी नेण्यात आली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास चालक शहीद शेख हे तेथे दुरुस्ती करीत असताना काही अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला.ही बाब त्यांचे भाऊ अजीम आणि अमजद यांना समजताच ते ग्यारेज वर विचारपूस करण्यासाठी गेले असता त्याच्यावर देखील हल्ला करण्यात आला .दोन्ही जखमींवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या मारहाणी दरम्यान शहीद यांच्या जवळील रक्कम गहाळ झाली आहे.अशी माहिती जखमींनी दिली.या प्रकरणी एम.आय.डी.सी सिडको पोलीस ठण्यात दुपारपर्यंत फिर्याद आलेली न्हवती अशी माहिती पोलिसांनी दिली. दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाले नाही. त्यामुळे हा लुटीचा प्रकार होता की मग वादविवादातून मारहाणीची घटना घडली हे स्पष्ठ होऊ शकले नाही.













